शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढणारी भाजी | 'या' भाजीचे फायदे वाचून तुम्ही सुद्धा नक्की खाल |Kantola Vegetable Benefits| करटोली रानभाजी | Spiny gourd

 

शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढणारी भाजी | 'या' भाजीचे फायदे वाचून तुम्ही सुद्धा नक्की खाल |Kantola Vegetable Benefits| करटोली रानभाजी | Spiny gourd

करटोली रानभाजी | Spiny gourd




पावसाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील महिला अनेक रानभाज्या बाजारात विकण्यासाठी घेऊन आलेल्या तुम्ही पाहिल्या असतील . त्यातील बऱ्याच रानभाज्या आपल्याला माहीत सुद्धा नसतात . अशाच एका रानभाजीबद्दल आपण जाणून घेऊया . ती भाजी म्हणजे करटोली रानभाजी . अनेक जणांना करटोली भाजी माहिती आहे ,पण ही भाजी कशी बनवायची हेच माहिती नसते . त्यामुळे ही भाजी घेणे टाळले जाते . परंतु ही भाजी आरोग्याला फायदेशीर आहे . त्यामुळे या भाजीची आता निर्यात सुद्धा केली जाते . प्रथम आपण या भाजीबद्दल जाणून घेऊया . या भाजीचे शास्त्रीय नाव मोमारडिका डायओयिका (Momordica dioica )असे असून ती कुकुरबिटेसी ( Cucurbitaceae ) या कुळातील आहे . ही भाजी कारल्याच्या प्रजातीमधील असली तरी ती कारल्यासारखी कडवट नसते . या भाजीला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत .जसे की कंटोला,कर्टुली. कर्कोटकी ,करटोली , कनटोली,कारटोली ,रानकारली ,करटुली अशा अनेक नावांनी ही भाजी ओळखली जाते .इंग्रजीत या भाजीला 'वाइल्ड करेला फ्रूट ' किंवा Spine gourd असे म्हटले जाते . ही भाजी भारतातील विदर्भ ,मराठवाडा ,कोकण , पश्चिम घाट येथे मोठ्या प्रमाणावर आढळते .या भाजीमध्ये प्रोटीन ,कार्बोहायड्रेट्स ,विटामीन ए , कॅल्शियम ,मॅग्नेशियम ,पोटॅशियम ,झिंक ,कॉपर ,सोडियम ,विटामीन बी1 , बी 2 ,बी 3 ,बी 5 ,बी 6 ,बी 9,बी 12 , विटामीन सी ,विटामीन डी असे अनेक पोषक तत्वे आढळतात . म्हणून या भाजीला खूपच महत्व आहे .

करटोली रानभाजी | Spiny gourd



करटोली वनस्पतीचे वर्णन :

ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे .ही भाजी डोंगराळ भागात व माळरानावरील छोट्या छोट्या झुडुपांवर आढळते . पाऊस पडला की जमिनीत असलेल्या कंदापासून वेल तयार होत जाते . पाने साधी एका आड एक आणि रुंद ,अंडाकृती तसेच हृदयाकृती, दातेरी कडा असलेली असतात . करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले येतात . फुले ही पिवळी असून एकलिंगी असतात . नर आणि मादी फुले ही वेगवेगळ्या वेलींवर येतात . फुलांना पाच पाकळ्या असून त्या एकमेकांना चिकटलेल्या असतात .तर फळे काटेरी आवरण असलेली लंबगोलाकार असतात . फळांमध्ये लाल गरात लगडलेल्या अनेक बिया असतात . या भाजीला लंबगोलाकार कंद असतो त्यावर कंकणाकृती खुणा असतात त्याचा वापर औषधात केला जातो .

करटोली रानभाजी | Spiny gourd



करटोलीचे औषधी गुणधर्म व भाजी खाण्याचे फायदे :


1 ) वरुन काटेरी दिसणारी ही भाजी फायबर आणि अॅंटी ऑक्सिडंटयुक्त असल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल विष्ठेद्वारे बाहेर काढण्यास मदत करते.
2 ) मूतखडा ,डोक्याचा त्रास ,हत्तीरोग ,सर्व प्रकारची विषबाधा या विकारांमध्ये कंदाचा वापर केला जातो .
3 ) आतड्यांच्या तक्रारीत व मुळव्याधीत रक्तस्राव थांबवण्याकरिता करटोलीचे भाजलेले कंद उपयोगी आहे .
4 ) पाने ही कृमिनाशक असून ताप ,दमा ,श्वासनालिका दाह , बद्धकोष्ठता , मूळव्याध यावर गुणकारी आहेत .
5 ) करटोलीचे फळ हे मधुमेह ,कुष्ठरोग ,मूत्रस्त्राव ,वात यावर उपयुक्त आहे .
6 ) सर्दी . खोकला ,ताप अशा आजारांवर ही भाजी फायदेशीर आहे .
7 ) करटोलीची भाजी नियमित सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो.
8 ) हायपरटेन्शन किंवा हाय बीपी असणाऱ्या लोकांनी या भाजीचे सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते .
9 ) हायरटेन्शनमध्ये करटोलीचा ज्यूस प्यायल्यास आराम मिळतो .
10) या भाजीत मोठ्याप्रमाणावर फायबर असून कॅलरीचे प्रमाण कमी आहे . परिणामी ही भाजी वजन कमी करण्यास उपयुक्त आहे
11 ) पोट साफ होण्यासाठी व शरीराची शक्ती वाढण्यास मदत होते .
12 ) मधुमेहाच्या रुग्णांनी ही भाजी नियमित खाल्ल्यास रक्तातील साखर कमी होते .
13) त्वचारोग होऊ नये म्हणून ही भाजी अवश्य खाल्ली पाहिजे .

करटोली रानभाजी | Spiny gourd



करटोलीची भाजी बनवण्याची पद्धत :


साहित्य :

करटोली, कांदा ,हिंग ,मोहरी ,जिरे ,हळद , मिरची पावडर , तेल ,मीठ

कृती :

करटोलीचे आडवे भाग करून किंवा उभी चिरून त्यातील बारीक बिया व गर काढून टाकावे . नंतर बारीक चिरून किंवा बारीक ,पातळ ,गोल चकत्या कापून घ्याव्यात . त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे ,मोहरी व हिंग टाकावे . त्यात बारीक चिरलेला कांदा व मिरची पावडर ,हळद टाका . मिश्रण व्यवस्थित परतून घ्यावे . त्यात चिरलेली करटोली टाकून पुन्हा परतून घ्यावे . नंतर झाकण ठेऊन 1-2 मिनिटे वाफ येऊ द्यावी . तद्नंतर झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ टाकावे . पुन्हा झाकण न ठेवता गॅस मंद आचेवर ठेऊन पाणी न टाकता भाजी 4-5 मिनिटे परतून घ्यावी .

करटोली रानभाजी | Spiny gourd


निष्कर्ष :

करटोली ही भाजी खाद्य प्रकार तर आहेच ,परंतु या वनस्पतीचा वापर औषध म्हणूनही केला जातो . ही एक बहुगुणी वनस्पती आहे . ही वनस्पती सर्दी ,खोकला ,वात ,रक्तरोग,मळमळ , हृदयरोग , मधुमेह , कुष्ठरोग,डोळ्यांचे आजार , तोंडाला चव नसणे ,सर्दी ,खोकला ,ताप , पोट साफ होण्यासाठी व शरीराची शक्ती वाढण्यास मदत अशा अनेक आजार व विकारांवर गुणकारी आहे .

हे पण वाचा :


FAQ : शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढणारी भाजी | 'या' भाजीचे फायदे वाचून तुम्ही

सुद्धा नक्की ख्याल |Kantola Vegetable Benefits| करटोली रानभाजी | Spiny gourd

1) करटोली भाजी खाण्याचे फायदे कोणते आहेत ?

_करटोली भाजी वात ,रक्तरोग,मळमळ , हृदयरोग , मधुमेह , कुष्ठरोग,डोळ्यांचे आजार , तोंडाला चव नसणे ,सर्दी ,खोकला ,ताप , पोट साफ होण्यासाठी व शरीराची शक्ती वाढण्यास मदत अशा अनेक आजार व विकारांवर गुणकारी आहे .

2) करटोलीच्या कंदाचा उपयोग काय ?

_आतड्यांच्या तक्रारीत व मुळव्याधीत रक्तस्राव थांबवण्याकरिता करटोलीचा भाजलेला कंद गुणकारी आहे .

3) करटोलीच्या भाजीमध्ये कोणते विटामीन असतात ?
_विटामीन ए ,,विटामीन बी1 , बी 2 ,बी 3 ,बी 5 ,बी 6 ,बी 9,बी 12 , विटामीन सी ,विटामीन डी इत्यादी विटामीन आढळतात .

4) करटोलीच्या बिया कोठे मिळतात ?

_करटोलीच्या बिया जंगलात आढळतात . जेव्हा पावसाळ्यात ही वेल उगवून त्यावर फळे लागतात आणि ही फळे पिकली की बिया जमिनीवर खाली पडतात .

No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Powered by Blogger.