Costus speciosus | पेवा रानभाजी कशी बनवावी ?| Benefits of Costus speciosus
मित्रांनो भारत हा देश वनौषधींनी समृद्ध असा देश आहे. भारतामध्ये सुमारे 20,000 वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. त्यापैकी सुमारे 2500 वनस्पती या औषधी वनस्पती आहेत . या औषधी वनस्पतींपैकीच एक असलेली वनस्पती म्हणजेच पेव वनस्पती होय. या वनस्पतीला काही भागांमध्ये पेवा या नावाने सुद्धा ओळखले जाते. Costus speciosus ही एक महत्त्वाची औषधी आणि शोभेची वनस्पती आहे. ही वनस्पती अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. या वनस्पतीचे लॅटिन नाव Costus speciosus असे आहे . तर शास्त्रीय नाव Cheilocostus speciosus असून ही वनस्पती कोस्टेसी ( Costaceae ) कुळातील आहे . ही वनस्पती संपूर्ण उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणजेच आफ्रिका आशिया आणि अमेरिका खंडात आढळते. भारतामध्ये ही वनस्पती हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्या तसेच हिमाचल प्रदेश ,आसाम, विंध्य,सातपुडा पर्वताच्या टेकड्या, आंध्र प्रदेशाचा पूर्व घाट व पश्चिम घाट ,कर्नाटक ,तमिळनाडू, केरळचे घाट आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सह्याद्री पर्वत रागांमध्ये ही वनस्पती मुबलक प्रमाणात आढळते.
ही वनस्पती सुमारे पाच ते सहा फूट उंचीपर्यंत वाढते.ही एक रसाळ ,ताठ, सरळ आधाराशिवाय वाढणारी वनस्पती असून खोडावर गडद हिरव्या रंगाची लंबवर्तुळाकार किंवा अंडाकृती पाने असतात . या वनस्पतीला साधारणपणे जुलै - ऑगस्ट महिन्यात गुच्छाने पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले येतात.फुलांच्या पाकळ्या सुंदर आणि आकर्षक असतात . ही फुले क्रेप पेपरसारखी दिसतात म्हणून याला Crepe ginger असे म्हणतात . फुले ही कपाच्या आकाराची असतात आणि त्यामध्ये क्रेस्ट पिवळे पुंकेसर असतात . ही फुले हिवाळ्याच्या हंगामात सुकतात . फळे लाल रंगाची असतात . त्यामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात . या वनस्पतीला संस्कृतमध्ये केमुका, कुष्टा, काश्मीरा , शूरा ,कटार कटार कन्नडमध्ये पुष्पमूला, तेलुगुमध्ये कश्मीरामू ,चेंगलवा कोष्टा हिंदी आणि बंगालीमध्ये केऊ कंद, केऊ व तमिळमध्ये कोटट्म किंवा कोष्टम , आसामी मध्ये जोम लाखुती तर इंग्रजीमध्ये Crepe ginger आणि मराठीमध्ये पेनवा किंवा पुष्करमुला,पेव ,पेवगा,पेवा या नावांनी ओळखले जाते.
Benefits of Costus speciosus
पेवा भाजीचे औषधी गुणधर्म :
1 ) या वनस्पतीचा उपयोग अन्न म्हणून तर केला जातोच ,परंतु औषध म्हणून मोठया प्रमाणावर उपयोग केला जातो .
2 ) राईझोमचा रस डोक्याला थंड आणि आराम देण्यासाठी लावला जातो .
3 ) या वनस्पतीची पाने डोकेदुखी आणि तापावर गुणकारी आहेत .
4 ) कफ ,खोकला ,जखम ,खरूज ,सर्पदंश , कावीळ ,संधिवात यावर ही वनस्पती गुणकारी आहे .
5 ) जळजळ , बद्धकोष्ठता ,कुष्ठरोग ,त्वचा रोग ,दमा ,अशक्तपणा ,आतडयातील उष्णता ,जंत , डोळ्यांचा आणि कानाचा संसर्ग , नाक दुखणे ,पुरळ , उलट्या थांबवण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो .
6 ) या वनस्पतीचे राईझोमस कडू ,तुरट परंतु शीतलक , कामोत्तेजक आणि कृमिनाशक असतात .
पेवा भाजी बनवण्याची पद्धत ( Peva Bhaji Recipe ) :
साहित्य :
पेवा भाजीची कोवळी पाने , 1-2 कांदे ,मिरची पावडर , हळद , तेल , मीठ कृती :
प्रथम पेवा भाजीची कोवळी पाने स्वच्छ धुऊन घ्या . नंतर पानांचे देठ कापून टाका . भाजीची पाने बारीक कापून घ्या . कापून घेतलेली भाजी एक उकळा येईपर्यन्त गरम पाण्यात उकळून घ्या . उकळून घेतलेली भाजी गाळून घेऊन अलग करा. थोडावेळ भाजी थंड होऊ द्या . थंड झालेली भाजी हाताने पिळून घ्या . पिळून घेतलेली भाजी मोकळी करा . त्यात चवीनुसार मीठ टाका . नंतर त्यात हळद ,मिरची पावडर टाकून मिश्रण एकजीव करा . म्हणजेच भाजीला मसाला लाऊन ठेवा . त्यानंतर गॅसवर कढई ठेऊन तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाका . कांद्याला गुलाबी रंग आल्यानंतर त्यात मसाला लाऊन ठेवलेली भाजी टाकून ती व्यवस्थित परतून घ्या . त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेऊन भाजी शिजू द्यावी . 2-3 मिनिटांनी पुन्हा भाजी परतून घ्यावी . थोडा वेळ आणखी भाजी शिजू द्यावी . शिजलेल्या भाजीचा भाकरी सोबत नक्कीच आस्वाद घ्या .
निष्कर्ष :
पेवा ही भाजी खाद्य प्रकार तर आहेच ,परंतु या वनस्पतीचा वापर औषध म्हणून मोठ्याप्रमाणावर केला जातो . या वनस्पतीबद्दल सांगायचे झाल्यास ही एक बहुगुणी वनस्पती आहे . ही वनस्पती कफ ,खोकला ,जखम ,खरूज ,सर्पदंश , कावीळ ,संधिवात ,जळजळ , बद्धकोष्ठता ,कुष्ठरोग ,त्वचा रोग ,दमा ,अशक्तपणा ,आतडयातील उष्णता ,जंत , डोळ्यांचा आणि कानाचा संसर्ग , नाक दुखणे ,पुरळ , उलट्या थांबवण्यासाठी अशा अनेक आजारांवर उपयुक्त आहे .
FAQ : Costus speciosus | पेवा रानभाजी कशी बनवावी ?| Benefits of Costus speciosus
1) कॉस्टस स्पेसियससचा ( पेव ) उपयोग काय ?
_ राईजोमचा उपयोग आयुर्वेदात न्यूमोनिया , बद्धकोष्ठता ,त्वचा रोग , ताप, दमा ,जळजळ ,अशक्तपणा , खोकला , जलोदर, लघवीचे आजार आणि कावीळ इत्यादी आजारांवर केला जातो .
2 ) कॉस्टस स्पेसियससचचे ( पेव ) सामान्य नाव काय ?
_ Crepe ginger ,Setawar Tawar ,Spiral Flag ,Cane Reed ,Malay Ginger ,Spiral Ginger,White Costus.
3 ) Costus speciosus खाण्यायोग्य आहे का ?
_ होय , या वनस्पतीच्या पानांची भाजी केली जाते . फुले ही बहुतेकदा सॅलडमध्ये वापरली जातात . तर राईझोमपासून सिरप बनवले जाते .
4 ) What is the use of crepe ginger ?
_ राईझोमचा वापर हा ताप , पुरळ , दमा , आतडयातील जंतावर उपचार तसेच कॉस्मेटिक्समध्ये केला जातो .
Post a Comment