खेकडा पालन व्यवसाय | Crab farming | खेकडा शेती एक उत्तम व्यवसाय

 

       खेकडा  पालन व्यवसाय | Crab farming | खेकडा शेती एक उत्तम व्यवसाय


Crab farming
                                                                     crabs farmig

मित्रांनो आज शेतीला जोड व्यवसाय म्हणून  आपल्या महाराष्ट्रामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन , मासे पालन तसेच दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. परंतु या व्यवसायात गुंतवणूक आणि कष्टही प्रचंड आहेत. तसेच या व्यवसायातून मिळणारा नफा त्या प्रमाणात कमी आहे आणि स्पर्धा मात्र खूप मोठी आहे. या व्यवसायाच्या तुलनेत खेकडा पालन हा एक उत्तम असा पूरक व्यवसाय होऊ शकतो. आपल्या देशाचा व महाराष्ट्राचा विचार केला असता खेकड्याची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या देशातील लोक खेकडा आवडीने खातात.

    आज आपण या लेखामधून गोड्या पाण्यातील खेकडा पालन व्यवसाय कसा करायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत .तर मित्रांनो हा व्यवसाय करताना आपल्या परिसरातील ग्राहकांची मागणी किती आहे याचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. खेकड्याला खवय्ये आणि रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परंतु खेकडा बाजारात उपलब्ध नसतो. काही ग्राहकांना तर सर्वत्र फिरूनही मिळत नाहीत. हीच तुमच्यासाठी संधी असू शकते. साधारणत: एक वर्षानंतर खेकडा विक्रीयोग्य बनतो . प्रति खेकड्याचे वजन 200 ग्रॅम पर्यन्त भरते . 4 ते 5 खेकड्यांचे वजन एक किलोच्या आसपास भरते . खेकडे पालनासाठी अन्य व्यवसायांपेक्षा श्रम ,जागा व खर्च कमी येतो आणि उत्पन्न मात्र जास्त मिळते . देखभालही फार नाही .

    1) खेकडा पालन कसे सुरु करावे ?


    तुम्हाला खेकडा पालन सुरु करावयाचा झाल्यास तुमच्या परिसरामध्ये इतर ठिकाणी कोठे खेकडा पालन व्यवसाय केला जातो का ? याची माहिती मिळवावी आणि तेथे जाऊन त्याची संपूर्ण माहिती घ्यावी.


    2) खेकडा पालनसाठी जागेची निवड व टाकीचे बांधकाम कसे करावे ?



    Crab farming
    crabs farmig

    खेकडा पालनसाठी जागा ही मोकळी व हवेशीर असावी. जवळ पाणी व लाईट इत्यादी सुविधा असाव्यात. जागेची निवड केल्यानंतर किती खेकड्यांचे पालन करायचे हे ठरवावे लागते. त्यानुसार टाकीचे बांधकाम करावे लागते.या व्यवसायासाठी तुम्ही तुमच्या घराजवळ 20 बाय 15 फूट लांबी- रुंदीची व 4 फुट खोलीची टाकी बांधावी.टाकीचे बांधकाम करताना पूर्णपणे आरसीसी मध्येच बांधकाम करून घ्यावे. त्याच्या बाजूस 15 बाय 6 फूट आकाराची छोटी टाकी बनवावी. ही टाकी पूर्णपणे पाण्याने भरून ठेवावी. मुख्य टाकीत अर्धा फूट पाणी सोडून त्यात खेकडा पालन करावे.टाकीतून खेकडे बाहेर जाऊ नये म्हणून साधारणपणे दोन ते तीन फूट उंचीची आतल्या बाजूने टाइल्स बसवून घ्यावी. खेकडे ठेवलेल्या टाकीतील पाणी साधारणपणे 15 दिवसांतून बदलावे आणि छोट्या टाकीतून नवीन पाणी घ्यावे .मुख्य टाकीच्या आतमध्ये नैसर्गिक वातावरण तयार करून त्यात खेकड्यांना आसर्‍याची जागा म्हणून पाण्यात वाढणाऱ्या गवताचे गठ्ठे ठेवावेत .तसेच माती ,वाळू, दगड टाकून घ्यावे.

    3) खेकड्याची पिल्ले कुठून व कशी मिळवावीत ?



    Crab farming
     crabs farmig

    खेकड्यांची पिल्ले जवळच्या मार्केटमधून विकत घ्यावीत किंवा जून-जुलैमध्ये जाणकार व्यक्तीच्या मदतीने नाले, ओढ्यांमधून खेकड्यांची पिल्ले पकडून आणून ती टाकीत टाकावीत व त्यांचे संगोपन करावे . टाकीत टाकलेल्या पिल्लांमध्ये मादी प्रजातीची पिल्ले जास्त प्रमाणात असावीत. कारण एक मादी 500 ते 1000 पिल्लांना जन्म देते.त्यामुळे त्यांची पैदासही मोठ्या प्रमाणावर होते .


    4) खेकड्यांना चारा कोणता घालावा ?


    खेकड्यांना घरात राहिलेले अन्न व भात तसेच मास्याचे तुकडे अन्न म्हणून देता येतात . खेकड्यांना अन्न अत्यल्प लागत असल्यामुळे त्यावर होणारा खर्च खूप कमी येतो .


    5) खेकड्यांची विक्री कशी करावी ?


    खेकड्यांची मार्केटिंग व विक्री ही whatsapp च्या माध्यमातून सुद्धा करता येते . तसेच ढाबा , हॉटेलमध्येही विक्री करता येते . या व्यवसायात 50 ते 60 टक्के नफा होतो.


    Crab farming
                                                                             crabs farmig

    6) खेकडा खाण्याचे फायदे ?


    खेकड्यांमध्ये विविध प्रकारची खनिजद्रव्ये आणि प्रथिने असतात . त्यांचा विविध विकारांवर उपयोग होऊ शकतो -

    1. रक्तदाब नियंत्रणात राहतो.

    2. वजन कमी करण्यास खेकडा उपयुक्त आहे.

    3. गुडघेदुखी आणि सांधेदुखी यांच्या उपचारासाठी खेकड्याचे सेवन केले जाते.

    4. मधुमेह रुग्णांसाठी खेकड्यांचे सेवन लाभदायक आहे.

    5. खेकड्यांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

    6. खेकड्यामध्ये विटामिन बी 12 चे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तपेशींची निर्मिती वाढते.

    7 .खेकडे खाल्ल्याने ॲनिमियाचा धोका कमी होतो


    व्यावसायिक खेकडा पालन हा एक खूपच लाभदायक व्यवसाय आहे . त्यामुळे हा व्यवसाय एक उत्तम रोजगाराचे साधन बनू शकते . सुशिक्षित बेरोजगारांसाठी पैसे कामावण्याचा हा एक चांगला पर्याय आहे .

    तर मित्रांनो आज आपण खेकडा पालन व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे .तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा.


    हे पण वाचा - शेवळा एक रानभाजी

    पावेटा /फापट रानभाजी

    कुरडूची भाजी कशी बनवावी ?

    टाकळा एक रानभाजी

















    No comments

    ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

    Powered by Blogger.