उंबराच्या फळांची भाजी कशी बनवावी | उंबराच्या फळांची भाजी| उंबर |Umbarachi bhaji

 

उंबराच्या फळांची भाजी कशी बनवावी | उंबराच्या फळांची भाजी| उंबर |Umbarachi bhaji

Umbarachi bhaji

उंबराच्या फळांची भाजी कशी बनवावी

मित्रांनो जंगलात भटकंती करताना आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात. यातील बऱ्याचशा वनस्पती या औषधी वनस्पती असतात. या वनस्पतींपैकी काही वनस्पती उंचच उंच अगदी आकाशाला गवसणी घालताना दिसतात . तर काही वनस्पती या उंचीने कमी असतात. विविध वेलीसुद्धा या वनस्पतींचा आधार घेऊन आपलं अस्तित्व टिकून असतात. याच वनस्पतींवर जंगलातील प्राणी ,पक्षी गुण्यागोविंदाने राहत असतात. अशा वनस्पतींपैकीच उंबराचे झाड हे सर्वांच्याच परिचयाचे आहे. या झाडाचा आढळ साधारणपणे नदी ,नाले आणि ओढ्याच्या कडेला असतो. जंगलात भटकंती करताना फळांनी बहरलेले उंबराचे झाड दिसल्यास मन प्रसन्न होऊन जाते. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे फळाच्या आतमध्येच त्याची फुले असतात. उंबराच्या फळांमध्ये 'फिग वास्प' नावाची छोटीशी माशी जाऊन या फुलांचे परागीभवन करते. उंबराच्या झाडावर असलेली हिरवीगार फळे म्हणजेच एक रानभाजी आहे. आज आपण या लेखात उंबराच्या फळांची भाजी कशी बनवावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी आपण उंबर या वनस्पती बद्दल माहिती जाणून घेऊया. Umbarachi bhaji

उंबराच्या फळांची भाजी कशी बनवावी ?

वनस्पतीचे वर्णन

उंबराच्या फळांची भाजी
उंबराच्या झाडाला औदुंबर असेसुद्धा म्हटले जाते. उंबराचे झाड हे पिंपळ, वड ,अंजीर या सदापर्णी वनस्पतींच्या मोरेसी कुळातील असून त्याचे शास्त्रीय नाव फायकस रेसिमोझा (Ficus racemosa ) असे आहे . उंबराचे झाड प्रामुख्याने भारत ,ऑस्ट्रेलिया ,म्यानमार तसेच श्रीलंका इत्यादी देशात आढळते. या झाडाची उंची साधारणपणे 12 ते 18 मीटर पर्यंत असते. पाने ही गडद हिरव्या रंगाची अंडाकृती आणि एका आड एक अशी आलेली असतात. खोडावरची साल जाड गुळगुळीत आणि पिंगट करडी रंगाची असते. फळे ही दोन ते पाच सेंमी व्यासाची मोठ्या फांद्यांवर घोसांनी आलेली असतात. या फळांनाच उंबर असे म्हणतात. ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर लाल होतात. या झाडावर पिकलेली लाल फळे खाण्यासाठी पक्ष्यांची गर्दी नेहमीच बघायला मिळते. त्यामुळे उंबराचे झाड हे पक्षी ,कीटक ,प्राणी यांचे आवडते वस्तिस्थान असते. Umbarachi bhaji

उंबर वनस्पतीचे उपयोग व औषधीगुणधर्म


1 ) विंचू चावल्यावर उंबराच्या झाडाची पाने वाटून लावल्यास वेदना कमी होतात.

2 ) मधुमेह उन्हाळी ,उचकी ,गोवर अशा रोगांवर उंबराची पाने ,फळे गुणकारी आहेत.

3 ) उंबराच्या झाडाच्या चिकाचा लेप गालगुंडावर लावल्यास त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

4 ) कच्च्या फळांची भाजी केली जाते तर लाल फळे खातात.

5 ) गोवर कांजण्या आजारामध्ये उंबराच्या मुळाचे पाणी प्यायला देतात.

6 ) अनेक उष्णतेच्या आजारांवर ,मुळव्याध, रक्तपित्त, जिभेला फोड येणे, अल्सर इत्यादी आजारांवर उंबराची पाने,फळे, मुळे, चीक गुणकारी आहेत. Umbarachi bhaji

उंबराच्या फळांची भाजी

हिरव्या फळांची भाजी बनवण्याची पद्धत

उंबराच्या फळांची भाजी कशी बनवावी

साहित्य : उंबराची कोवळी फळे,कांदा ,लसूण ,टोमॅटो, तेल,हळद, तिखट,मीठ इत्यादी.

कृती : प्रथम उंबराची कोवळी फळे धुऊन घ्यावीत. धुवून घेतलेली फळे मिठाच्या पाण्यात उमवून घ्यावीत. उमवून घेतलेली फळे थोडा वेळ थंड होऊ द्यावीत . थंड झालेली फळे फोडून बारीक बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला लालसर रंग येईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात लसुण व टोमॅटो टाकून बारीक तुकडे करून ठेवलेली भाजी टाका. त्यात गरजेनुसार हळद ,तिखट व मीठ टाकून चांगले परतून घ्यावे .













No comments

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !

Powered by Blogger.