Pages

रविवार, २५ जून, २०२३

पावेटा एक रान भाजी |पापट |फापट |Pavetta indica

 

पावेटा एक रानभाजी |पापट |फापट |Pavetta indica


Pavetta indica

पावेटा ही वनस्पती रुबियासी(Rubiaceae) कुळातील फुलांच्या वनस्पतीची एक प्रजाती आहे. ही वनस्पती उप उष्ण कटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय तसेच आशिया खंडात जंगलात गवताळ प्रदेशात झाडे झुडपांमध्ये आढळते. भारतामध्ये ही वनस्पती दक्षिण द्विकल्प कल्प आणि पश्चिम घाटात म्हणजेच सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळते. या वनस्पतीला हिंदीमध्ये कंकरा, कथाचंपा, मनिपुरी मध्ये कुकुरचुरा ,तमिळमध्ये करनई, मल्याळम मध्ये मल्लिका मुट्टी, तेलुगूमध्ये पापी, कन्नडमध्ये पावती, बंगालीमध्ये जुई , ओरिया, पान ,आसामीमध्ये साम-सुकु संस्कृतमध्ये काकचडी तर मराठीमध्ये या वनस्पतीला , पापट,पापडील अशा विविध नावांनी ओळखले जाते.ही एक रानभाजी असून ती महाराष्ट्रात काही भागात फापट ,आसवला ,नडगीची फुले अशा विविध नावांनी ओळखले जाते .

Pavetta indica

पावेटा (Pavetta indica ) ही रानभाजी आपल्याला पानझडी जंगल,डोंगर उतारावर सहज नजरेस पडते. कधीकधी ही वनस्पती आपण रस्त्यानेही प्रवास करताना तिच्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी आपले लक्ष पटकन वेधून घेते. या वनस्पतीची फुले पांढरीशुभ्र असून ती पुंजक्याने फांदीच्या टोकाला आलेली असतात. ही एक झुडुपवर्गीय वनस्पती असून साधारणपणे या वनस्पतीला एप्रिल-जून महिन्यात लहान पांढरी शुभ्र नळीच्या आकाराची फुले येतात.या फुलांची भाजी केली जाते . या फुलांमध्ये चार पसरलेल्या पाकळ्या दिसून येतात. या फुलांचा सुगंध साधारणपणे मोगऱ्याच्या फुलांसारखा असल्यामुळे ही वनस्पती पटकन लक्ष वेधून घेते. ही वनस्पती साधारणपणे चार ते पाच फुटांपर्यंत वाढते.वनस्पतीचे खोड एकल दांडयाच्या पद्धतीने वाढते तर विरुद्ध दिशेने काटकोनात फांद्या पसरलेल्या असतात . झाडाची साल हलकी राखाडी -तपकिरी तर पाने गडद हिरव्या रंगाची असतात . परंतु काही प्रदेशात फुले येण्याआधीच खोडावरची पाने गळून पडतात. ही वनस्पती दोन ते चार मीटर बाजूला पसरते. फुले गळून गेल्यावर त्यावर असंख्य वाटण्यासारखे ,मांसल अर्ध गोलाकार दाट गुच्छांमध्ये फळे तयार होतात. ही फळे बहुतेक वेळा झाडावर दीर्घकाळ टिकतात. या फळांमध्ये एक ते दोन कडक गोलाकार बिया असतात. ही फळे हिरव्या ते गडद काळ्या रंगापर्यंत परिपक्व होतात. बिया असलेली फळे आणि पांढऱ्या शुभ्र सुवासिक फुलांमुळे मधमाश्या ,माश्या , पतंग,मुंग्या ,फुलपाखरे, बहुसंख्य कीटक तसेच कीटक खाणाऱ्या पक्ष्यांच्या प्रजाती या वनस्पतीकडे आकर्षित होतात.

Pavetta indica

उपयोग

या वनस्पतीमध्ये लिनोलिक ॲसिड ,फेर्सिलिक ॲसिड ,बीटा कॅरोटीन ,फेनोल्स ,फ्लेवनोइड्स , अल्कलोइड्स, क जीवनसत्व इत्यादी पोषक तत्वे आहेत . या वनस्पतीची पाने मूळव्याध आणि रक्तस्रावाच्या वेदनांसाठी वापरतात तर मुळांच्या सालीमध्ये डी-मॅनिटॉल असते.

टीप : ही भाजी बनवताना तुम्ही सुकट किंवा मोड आलेले वाल असे पदार्थ वापरू शकता आणि जर हे पदार्थ वापरायचे नसतील तर केवळ फुलांचीच भाजी तुम्ही बनवू शकता.

फापट रानभाजी




भाजी बनवण्याची पद्धत

साहित्य :
पावेटा भाजीची फुले, एक कांदा , दोन चमच मिरची पावडर, एक चमच हळद ,एक चमच धना पावडर ,तेल, मीठ इत्यादी

कृती :
प्रथम फुले गुच्छातून तोडून घ्या. तोडलेली फुले दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर उकळून घेतलेली फुले थंड करून दोन्ही हातानी व्यवस्थित पिळून घ्या. प्रथम तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्या. त्यानंतर त्यात दोन चमच मिरची पावडर, एक चमच हळद ,एक चमच धना पावडर टाका. नंतर त्यात उकळून पिळून घेतलेली भाजी टाका. नंतर गॅस मंद करून पातेल्यावर झाकण ठेवून त्यामध्ये थोडं पाणी टाका. थोड्या वेळाने झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ टाका आणि झाकण पुन्हा ठेवा. त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे भाजी व्यवस्थित शिजवून घ्या.

फापट रानभाजी


हे पण वाचा : शेवळा एक रानभाजी









शुक्रवार, ९ जून, २०२३

टाकळा रानभाजी |Cassia Tora|टाकळा रानभाजी कशी बनवावी ?


 टाकळा रानभाजी|Cassia Tora|टाकळा रानभाजी कशी बनवावी ?

टाकळा रानभाजी |Cassia Tora


टाकळा ही रोप वर्गीय वनस्पती असून ती ' सिसाल-पिनेसी ' म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे.या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅसिया टोरा (cassia tora) असे आहे. या वनस्पतीला काही भागांमध्ये 'तरोटा' किंवा 'तरवटा' अशा नावांनी देखील ओळखले जाते .ही वनस्पती पावसाळ्यात उगवते आणि एक ते दोन फुटांपर्यंत वाढते. ही वनस्पती आपल्याला पडीक जमिनीवर ,माळरानावर ,रस्त्याच्या कडेला, जंगलात अशा सर्वत्र ठिकाणी पाहायला मिळते. या वनस्पतीचे खोड गोलाकार असते तर फांद्या तळापासूनच तयार होतात. या वनस्पतीची पाने संयुक्त प्रकारची असून ती रात्री मिटतात. या वनस्पतीला फुले येण्याचा कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर असा असतो . या वनस्पतीची फुले पानांच्या बेचक्यात जोडीने येतात व त्यांचा रंग पिवळा असतो . तसेच या वनस्पतीला साधारणपणे 10 सेमी ते 16 सेमी लांबीच्या शेंगा येतात . बिया कठीण कवचाच्या काळसर किंवा करड्या रंगाच्या आणि एका बाजूला कापल्यासारख्या असतात .

टाकळा रानभाजी |Cassia Tora

औषधी उपयोग :

टाकळा या वनस्पतीमध्ये एमोडीन ग्लुकोसाइड आहे त्यामुळे ही वनस्पती सर्व प्रकारच्या त्वचा रोगांवर फायदेशीर आहे . त्वचा रोग झाला असल्यास पानांची भाजी देतात व बिया वाटून त्याचा लेप सुद्धा देतात. मुळे उगाळून त्यात लिंबाचा रस टाकून गजकर्णसाठी वापरतात . पानांचा काढा लहान मुलांच्या दात येण्याच्या वेळी येणाऱ्या तापवर दिला जातो . पित्त ,श्वास ,खोकला ,हृदयविकार यासाठी टाकळ्याच्या पानांचा रस मधातून दिला जातो .

टाकळ्याची भाजी रेसिपी :


टाकळ्याची भाजी गुणाने उष्ण असल्यामुळे मानवाच्या शरीरातील वात व कफ कमी करण्यास मदत करते. तसेच ही भाजी खाल्ल्यामुळे खरूज, अॅलर्जी, सोरायसिस, इसब असे त्वचा विकार कमी होण्यासही मदत होते. ह्या भाजीमुळे लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडतात. ही भाजी पचायला हलकी व मलसारक आहे.

साहित्य :

टाकळ्याची कोवळी पाने, हिरवी मिरची, कांदा ,तेल , लसूण ,मीठ, हळद, खोबरे, आले ,गुळ,भिजवलेली तूरडाळ किंवा मुगडाळ इत्यादी.

कृती :

प्रथम टाकळ्याची कोवळी पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी. नंतर कढईत तेल टाकून कांदा तेलात परतून घ्यावा. नंतर त्यात लसूण हळद व हिरवी मिरची टाकून घ्यावी. नंतर त्यात बारीक चिरून घेतलेली भाजी टाकावी व ती वाफेवर शिजू द्यावी. थोड्या वेळाने त्यात थोडा गूळ व मीठ टाकावे आणि नंतर त्यावर खोबरे घालावे. त्यानंतर तूरडाळ किंवा मुगडाळ टाकावी यामुळे भाजी आणखीनच चवदार बनण्यास मदत होते.

टाकळा भाजी |Cassia Tora

हे पण वाचा  :  शेवळा एक रानभाजी                                                                                                                                           




सोमवार, ५ जून, २०२३

POST SSC DIPLOMA ( पूर्णवेळ तांत्रिक पदविका ) शैक्षणिक वर्ष 2025 प्रवेश सुरू

 


POST SSC DIPLOMA ( पूर्णवेळ तांत्रिक पदविका ) शैक्षणिक वर्ष 2025 प्रवेश सुरू




POST SSC DIPLOMA 2025 -26



शैक्षणिक वर्ष 2025- 2026 करिता प्रथम वर्ष पोस्ट एसएससी ( दहावी नंतरचे ) पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रथम वर्ष पोस्ट एचएससी पदविका औषध निर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्य-पेय व्यवस्था तंत्रज्ञान, सरफेस कोटिंग तंत्रज्ञान अभ्यासक्रम आणि थेट द्वितीय वर्ष पोस्ट एस एस सी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे.

प्रवेश अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहे -

महाराष्ट्रातील सर्वसाधारण प्रवर्ग उमेदवार, महाराष्ट्र राज्याबाहेरील प्रवर्ग उमेदवार रु. 400/-

महाराष्ट्रातील राखीव प्रवर्ग उमेदवार आणि दिव्यांग उमेदवार रु.300/-

प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांनी खालील वेबसाईट वरून अर्ज करण्याची योग्य पद्धत निवडून ऑनलाईन नोंदणी

करावी व कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात.

वेबसाईटवरील माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा.

Pdf पाहण्यासाठी येथे क्लिक करा .

अधिकृत वेबसाईट- येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची पहिली तारीख: दिनांक 20 मे 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : दिनांक 16 जून 2025


संदर्भ : https://poly25users.dtemaharashtra.gov.in/

रविवार, ४ जून, २०२३

भारतीय डाक विभागामध्ये पदांची भरती सुरू | India Post office Bharti 2025 | India Post office Bharti 2025


 भारतीय डाक विभागामध्ये पदांची भरती सुरू| India Post office Bharti 2025




India Post office Bharti 2025

भारतीय डाक विभागात ( India Post office) रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे इ.10 वी पास उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली भारतीय डाक विभागाची जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. भारतीय डाक विभागातील रिक्त पदांची माहिती, पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता व सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे आहे.

जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी - येथे क्लिक करा

भरती विभाग- भारतीय डाक विभाग

रिक्त पदे- - येथे क्लिक करा

पदाचे नाव : येथे क्लिक करा

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

मासिक वेतन- रुपये 12000 ते रुपये 29,380

अर्ज कसा करावा ? : ऑनलाइन पद्धतीने भारतीय डाक विभागाच्या संकेत स्थळावर जाऊन

करावा .

उमेदवाराची वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

(आरक्षित उमेदवारांसाठी शिथिलता)

निवड करण्याची प्रक्रिया : 10 वीच्या टक्केवारीनुसार

भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच उमेदवारांनी अर्ज करावा .

शनिवार, ३ जून, २०२३

शेवळा भाजी कशी बनवावी ? | How to make Shevala Bhaji |शेवळा |ड्रैगन स्टॉक याम रेसिपी |Dragon Stalk yam benefits

 


शेवळा भाजी कशी बनवावी ? | How to make Shevala Bhaji |शेवळा |ड्रैगन स्टॉक याम रेसिपी |Dragon Stalk yam benefits


Dragon Stalk yam benefits


पहिल्या पडलेल्या पावसात ओली झालेली माती ,त्या ओल्या झालेल्या मातीचा चोहीकडे दरवळणारा सुगंध, आणि हवेत पसरलेली आल्हाददायकता ....या सगळ्यात एक गोष्ट हमखास आठवते- चविष्ट रानभाज्या.ओल्या मातीच्या कुशीतून जणू प्रेमाने वर येणारी भाजी म्हणजे शेवळा . नैसर्गिकरीत्या उगवणारी ही भाजी अगदी निसर्गाचं एक सुंदर देणं आहे . ही एक अशी भाजी जी केवळ डोळ्यांनाच नाही ,तर मनालाही तृप्त करते . शेवळा ही एक कंदवर्गीय भाजी आहे. ही भाजी खाजरी असल्यामुळे स्वच्छ करताना हाताला तेल लावावे म्हणजेच त्रास होत नाही . शेवळा भाजी कशी बनवली जाते (How to make Shevala Bhaji ). तसेच Dragon Stalk yam benefits काय आहेत ते आता आपण बघू . तर भाजी बनवताना सोबत बोंड्याचा पाला किंवा काकड फळे ,कोकम आमसुले ,चिंच यासारख्या आंबट पदार्थायांचा वापर केला जातो .

शेवळा या भाजीला जंगली सुरण ,अरण्य सुरण किंवा रान सुरण अशा विविध नावाने देखील ओळखले जाते . महाराष्ट्रामध्ये ही भाजी कोकण ,अकोला तसेच पश्चिम महाराष्ट्र इत्यादी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते . या भाजीला शास्त्रीय भाषेत ॲमोरपोफॅलस कम्युट्यॅटस (Amorphophallus commutatus )असे म्हणतात . तर इंग्रजीमध्ये एलिफंट फुट याम ( Elephant Foot Yam )आणि ड्रॅगन स्टॉक याम ( Dragon Stalk Yam )असे म्हटले जाते .



1 ) शेवळा रानभाजीचे वर्णन :

                        या रानभाजीबद्दल सांगायचे झाल्यास या भाजीचे कंद जमिनीत चपटे व गोलाकार असतात . ही भाजी जमिनीपासून वर साधारणपणे 8  ते 10  इंच वाढलेली दिसते . काही ठिकाणी मात्र याच भाजीची प्रचंड आकारात वाढ झालेली पाहायला मिळते .या भाजीचा देठ  काही ठिकाणी   प्रचंड उंच , म्हणजेच  साधारणत: पाच  ते सहा  फुटांपर्यंत वाढलेला पाहायला मिळतो . मात्र या भाजीला काही भागांमध्ये 'काहकाऱ्या ' असे म्हटले  जाते . याचा पापुद्रा हा रंगाने हिरवट व थोड्या  पिवळ्या रंगाचा असतो . या भाजीचे  देठ ताजे असतानाच शिजवून खातात , तर  पापुद्रयाचा भाग वाळवून ठेवला जातो आणि नंतर हवे  तेव्हा तो भाजीसाठी वापरता येतो  .

शेवळा भाजीच्या वरच्या बाजूला एकावर एक असे पापुद्रयांचे  थर   मांडलेले     पाहायला मिळतात . या पापुद्रयांच्या आतमध्ये नाचणी सारख्या सूक्ष्म दाण्यांनी भरलेला   भाग असतो . त्याचबरोबर पिवळसर करड्या रंगाचा भाग आणि हिरवट ,काळे ,पांढरे ठिपके असतात . शेवळा ही रानभाजी रानावनात मोठमोठ्या झाडांच्याखाली ,मोठ्या दगडाच्या जवळ  ,लहान-मोठ्या झुडपांखाली नैसर्गिकरित्या उगवलेली पाहायला मिळते . ग्रामीण भागातील लोकांसाठी ही रानभाजी आता  एक चांगले आर्थिक उत्पन्नाचे साधन बनली आहे . पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारणपणे जून- जुलैमध्ये ही भाजी बाजारामध्ये सहज उपलब्ध होते .या रानभाजीला  शहरांमध्ये दिवसेंदिवस  मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत  आहे .



शेवळा भाजी कशी बनवावी ?



2 ) शेवळा भाजी कशी बनवावी ?


साहित्य :

 1 ) 2 - 3 जुडया शेवळा भाजी 

2 ) बोंडक्याचा पाला किंवा काकड फळे 

3 ) 1 किंवा 2 कांदे 

 4 ) 1 चमच हळद 

5 ) 1 किंवा 2 चमच तिखट 

6 ) 1 चमच धना पावडर 

7 ) लसूण 

 8 ) जिरे 

9 ) मोहरी 

10 ) तेल 

11 ) चवीनुसार मीठ 

आवडीनुसार किंवा आवश्यकता वाटल्यास खोवलेले खोबरे तसेच वाल सुद्धा वापरू शकता .

कृती :


                          शेवळा भाजी खाजरी असल्यामुळे प्रथम हाताला तेल लावून घ्या . भाजी स्वच्छ करताना त्याच्या आतील म्हणजेच  भाजीच्या पापुद्रयाच्या आतमध्ये असलेला शेंदरी रंगाचा भाग काढून टाका . शेंदरी भाग वेगळा  काढल्यानंतर उरलेली  भाजी बारीक कापून घ्या . भाजी कापून झाली की , पुढची पायरी म्हणजे  बोंडक्याचा पाला कापून तयार करणे  किंवा काकड फळांचा रस काढणे   आणि तो  भाजीत टाकावा  . त्यानंतर गरम पाण्यात भाजी शिजवून घ्या . आवश्यकता वाटल्यास चवीनुसार  त्यात आमसुल ,चिंच इत्यादी आंबट पदार्थ टाकले तरी चालतात  . नाही टाकले तरी चालतात . त्यानंतर भाजी थोडावेळ,म्हणजेच   दहा  ते पंधरा  मिनिटे शिजवून घ्या . शिजवून घेतलेल्या भाजीत हळद ,तिखट ,मीठ ,धना पावडर इत्यादी पदार्थ टाका . त्यानंतर मिश्रण एकजीव करा . त्यानंतर पातेल्यात तेल गरम करा . तेल गरम झाल्यानंतर त्यात प्रथम  जिरे ,मोहरी टाकून फोडणी करा ,मग त्यात लसूण आणि कांदा  टाका . हे  मिश्रण खरपूस लालसर होईपर्यन्त परतावे  . त्यानंतर त्यात एकजीव केलेले भाजीचे मिश्रण टाकावे आणि पळीने हलक्या हाताने  परतून घ्यावे . पुन्हा भाजी 10 ते 15 मिनिटे मऊसर होईपर्यंत  शिजू द्यावी . सुमारे दहा ते पंधरा  मिनिटानंतर भाजी तयार होते .


रानभाजी शेवळा



3 ) शेवळा भाजी खाण्याचे फायदे :


                           शेवळा भाजी ही मुळात शेतात पिकवली जात नाही ,तर  ती रानावनात निसर्गाच्या सानिध्यात नैसर्गिकरित्या जमिनीतून उगवते  . ही भाजी शुद्ध नैसर्गिक पद्धतीने उगवलेली असते , त्यामुळे या भाजीला मानव निर्मित कोणत्याही प्रकारचे रासायनिक  खत मिळत नाही . त्यामुळे या भाजीला जैवविविधतेतून    विविध प्रकारची खनिजे  आपोआपच मिळतात जे मानवाच्या शरीरासाठी आरोग्यवर्धक  असतात . तसेच या भाजीमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी जीवनसत्त्वे  भरपूर प्रमाणात  असतात . अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शेतीपद्धतीमुळे पिकांवर प्रचंड प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो . त्याचा घातक परिणाम मानवाच्या शरीरावर होतो . अशा  भाज्यांमध्ये शरीरास पोषक घटक असतात त्यामुळे , अशा निसर्ग निर्मित भाज्या रोगप्रतिकरक  शक्ती वाढवतात  . आरोग्यवर्धक  गुणांसाठी या भाजीच्या कंदाची पाने दूध आणि साखरेसोबत वाजीकरणामध्ये वापरली  जातात . तसेच या भाजीच्या सेवनामुळे  पोटाचे विकार कमी  होण्यास मदत होते .

                     आज आपण शेवळा ही भाजी कशी बनवावी याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे . माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या .


हे पण वाचा :

                        टाकळा रानभाजी

                    भारंगी रानभाजी कशी बनवावी