"कोकणातील तरुणांसाठी उत्तम व्यवसाय संधी - कमी गुंतवणूक करा , जास्त नफा मिळवा "
कोकण हा भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील एक निसर्गरम्य ,समुद्र किनाऱ्यांनी व्यापलेला आणि विविधतेने नटलेला प्रदेश आहे . अरबी समुद्र आणि पश्चिम घाट यांच्यामध्ये वसलेल्या या भूप्रदेशात कृषिक्षमता ,सांस्कृतिक वारसा आणि अपार नैसर्गिक संपत्ती आहे . कोकणातील ठाणे ,मुंबई उपनगरातील ग्रामीण भाग ,रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही शेती ,मासेमारी ,प्रक्रिया उद्योग ,पर्यटन आणि सेवा क्षेत्रासाठी उत्तम व्यवसाय संधी देणारी ठिकाणे आहेत .
कोकण म्हणजे निसर्गाचे वरदान - डोंगर ,नद्या , जंगल ,समुद्रकिनारे ,सुपीक माती आणि समृद्ध सागर संपत्ती यांचा अफाट खजिना असलेला भूप्रदेश . तरीसुद्धा कोकणातील तरुणाई मोठया प्रमाणावर स्थलांतर करताना दिसून येते . यामागे अनेक कारणे असू शकतात . त्यापैकी एक म्हणजे इथे असलेल्या व्यवसायाच्या संधीबद्दलच्या माहितीचा अभाव किंवा प्रेरणेचा अभाव . प्रत्यक्षात कोकणात स्थानिक संसाधनावर आधारित कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देणारे बरेच व्यवसाय उपलब्ध आहेत . या ब्लॉगमध्ये तरुणाईला कोकणातच राहून सुरू करता येतील अशा काही प्रमुख व्यवसायांची माहिती पाहणार आहोत .
कमी गुंतवणुक करून सुरू करता येणारे कोकणातील फायदेशीर व्यवसाय ( Low investment business in Konkan )
कोककोकण णात कोणकोणते व्यवसाय करता येतील?
1) कृषी आधारित व्यवसाय
कोकणातील उष्ण व दमट हवामान तसेच लाल माती यामुळे येथे विविध प्रकारच्या फळबागा फुलविणे शक्य आहे . कोकणातील नफा देणारे काही ठळक व्यवसाय पुढील प्रमाणे करता येतात .
- तरुणांसाठी हापूस आंबा उत्पादन व विक्री व्यवसाय :
हापूस आंबा म्हणजे अल्फोन्सो आंबा . हा भारतातील आणि महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील एक अत्यंत प्रसिद्ध आणि उच्च दर्जाचा आंबा आहे . त्याचा रंग , चव ,सुवास आणि रेशमासारखी गुळगुळीत पोत असल्यामुळे तो जगभरात प्रसिद्ध आहे . त्यामुळे हापूस आंब्याला परदेशांतही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे .हापूस आंब्याच्या लागवडीसाठी कोकणात उष्ण व दमट हवामान आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आहे . आंब्याची रोपे साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत लावली जातात . एकदा झाड लावले की ते साधारणपणे 3 ते 5 वर्षात फळ देण्यास सुरुवात करते . झाडांची छाटणी ,कीड नियंत्रण ,पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यावर उत्पादनाचे प्रमाण आणि दर्जा अवलंबून असतो . तसेच सेंद्रिये पद्धतीने पिकवलेला हापूस आंबा चविष्ट व निरोगी असतो . त्यामुळे त्याला जास्त मागणी आणि चांगला दरही मिळतो .हापूस आंब्यांचा हंगाम साधारणपणे मार्च ते मे या कालावधीत असतो . त्यामुळे या कालावधीत आंब्यांची मागणी बाजारपेठेत खूप वाढलेली असते . आंबा विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी सध्या आधुनिक मार्ग निर्माण झाले आहेत . जसे की -
- थेट / प्रत्यक्ष ग्राहकांना विक्री ) :
थेट/ प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधून सोशल मीडिया (व्हॉटस्ॲप ,फेसबूक ,इंस्टाग्राम ) चा वापर करून आंब्यांची विक्री करून नफा मिळवता येतो .
- ऑनलाइन विक्री :
वेबसाइट तयार करून किंवा Amazon ,BigBasket , Flipkart अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरून आंब्यांची विक्री करता येते .
- निर्यात :
हापूस आंब्याला अमेरिका ,युरोप तसेच मध्यपूर्व देशांमध्ये मोठ्याप्रमाणवर मागणी असते . त्यामुळे APEDA कडे नोंदणी करून योग्य पॅकिंग व उत्तम दर्जा ठेऊन निर्यात करता येते .
- तरुणांसाठी काजू प्रक्रिया उद्योग :
काजू हे कोकणातील एक प्रमुख आणि नगदी पीक आहे . रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणवर घेतले जाते . काजू हा केवळ खाण्याचा पदार्थ नसून ,त्यापासून विविध प्रकारची प्रक्रिया केलेली मूल्यवर्धित उत्पादने तयार केली जातात . काजू प्रक्रिया उद्योगामुळे रोजगारनिर्मिती ,स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करता येते . तसेच निर्यातीची संधी मिळवून देणारा उत्तम असा हा व्यवसाय आहे . काजू प्रक्रिया उद्योगामध्ये खालील मूल्यवर्धित उत्पादने तयार करून व्यवसाय करता येतो .भाजीसाठी कच्चे काजू , काजू पावडर , भाजलेले व मसालेदार काजू , काजू बटर , काजूच्या मिठाया .
- विक्री व मार्केटिंग : -
स्थानिक बाजारपेठांमधील किराणा दुकाने , मिठाई विक्रेते आणि हॉटेल्स यांच्याकडे थेट विक्री करून नफा मिळवता येतो .ॲमॅझोन ,फ्लिपकार्ट किंवा स्वत:ची वेबसाइट तयार करून ऑनलाइन विक्री करता येते . APEDA कडे नोंदणी करून काजू निर्यातीचा व्यवसाय करता येतो .
- तरुणांसाठी फणस,नारळ ,सुपारी व करवंद यांची लागवड व प्रक्रिया उद्योग :
फणस ,नारळ आणि सुपारी ही कोकणातील प्रमुख लागवडीची तीन झाडे आहेत . तसेच ही झाडे दीर्घकालीन उत्पन्न देणारी आहेत . यांच्यापासून विविध प्रकारची उत्पादने तयार होतात . त्यामुळे या झाडांना व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे .
- फणस : -
फणस प्रक्रिया हा एक कोकणातील कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देणारा उद्योग सुरू करता येतो .
कोवळ्या फणसाची भाजी केली जाते
तळलेले गरे
गऱ्यांपासून जॅम ,जेली , चिप्स , लोणचे ,केक ,लाडू ,चिवडा ,पोळी ,ज्यूस ,स्क्वॅश
फ्रोजन साकट भाजी
- नारळ : -
नारळ पाणी विक्री
खोबरे विक्री
खोबरेल तेल काढणे व विक्री
नारळाच्या सालीपासून दोर तयार करणे
नारळाच्या करवंटया विक्री
सौंदर्यप्रसाधन व तेल उद्योगात मोठी मागणी असते .
- सुपारी : -
कोरडी ,सालीयुक्त ,फोडलेली आणि प्रक्रिया केलेली सुपारी विक्री
निर्यातीसाठीसुद्धा सुपारीला चांगली मागणी आहे .
फणस ,नारळ ,आणि सुपारी ही झाडे जर एकत्र लावली तर जमीन अधिक कार्यक्षमतेने वापरली जाते . यामुळे पाण्याचा योग्य वापर ,खताचा एकसंध पुरवठा आणि उत्पादनातील वाढ साधता येते . तसेच या तिन्ही झाडांपासून सातत्यपूर्ण व दीर्घकालीन उत्पन्न मिळते .
- करवंद : -
कोकणात जंगल मोठ्याप्रमाणवर असल्यामुळे करवंद सहज उपलब्ध होतात . ग्रामीण भागातील लोकांकडून खरेदी करून कच्ची फळे विकण्याचा व्यवसाय करता येतो . तसेच प्रक्रिया करून करवंद जॅम ,करवंद सरबत ,करवंद लोणचे , सुखवलेली करवंदे इत्यादी मूल्यवर्धित उत्पादने स्थानिक दुकाने ,हॉटेल्स ,किराणा स्टोअर्स ,तसेच ऑनलाइन विक्री करता येते .
- ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय :
मधमाशी पालन - कोकणातील जंगलामुळे नैसर्गिक मध विक्री व्यवसाय करता येतो .शेळी पालन /कोंबडी पालन - अशाप्रकारचे व्यवसाय ग्रामीण भागात कमी गुंतवणुकीत चालू शकतात .
मत्स्य व्यवसाय - तलावात गोड्या पाण्यातील माशांचा तसेच खाऱ्या पाण्यातही मत्स्य पालन व्यवसाय करता येतो .
2) पर्यटनाशी संबंधित व्यवसाय
कोकणात असलेली निसर्गसंपन्नता ,समुद्रकिनारे ,ऐतिहासिक स्थळं आणि स्थानिक संस्कृती यामुळे खालील अनेक पर्यटन व्यवसाय सुरू करता येऊ शकतात .
होमस्टे / गेस्ट हाऊस व्यासाय :
कोकणात उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवता येतो .जसे की -
- स्थानिक घरे पर्यटकांना भाड्याने देणे .
- स्थानिक कोकणी पद्धतीचे जेवण देणे .
कोकणी जेवणाचा अनुभव :
- पारंपरिक कोकणी थाळी ,मच्छी फ्राय ,मोदक ,सोलकढी इ . पदार्थांचा ' फूड टुर' किंवा ' घरगुती जेवण' अनुभव पर्यटकांना देणे .
ॲग्रो टुरिझम ( शेती पर्यटन ) :
- शेतकामाचा अनुभव देणे .
- स्थानिक उत्पादन विक्री करणे .
- आंबा ,काजू ,फणस ,नारळ यांच्या बागांमध्ये फिरणे .
अशाप्रकारचे अनुभव शहरातून आलेल्या लोकांसाठी फारच आकर्षक असतात .
वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय :
- बोटिंग ,जेट स्की ,बनाना राईड ,स्कूबा डायविंग अशा अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स सुरू करू शकतो . अशा क्रियाकलापांना पर्यटन हंगामात खूप डिमांड असते .
ट्रेकिंग व जंगल सफारी गाईड सेवा :
- साहसी पर्यटकांसाठी कोकणातील डोंगर ,घाट ,किल्ले ट्रेकिंग इत्यादीसाठी स्थानिक गाईड म्हणून सेवा देणे .
हस्तकला विक्री व्यवसाय :
- कोकणी हस्तकला ,वारली पेंटिंग ,शंख शिंपल्यांचे दागिने थेट दुकानात किंवा ऑनलाइन विक्री करणे .
फिशिंग टुर /मच्छीमार अनुभव :
- पर्यटकांना पारंपरिक मच्छीमार बोटीवर नेणे .
- माशांचा बाजार दाखवणे तसेच मासे पकडायला मदत करणे .
टुर गाईड / ट्रॅव्हल प्लॅनिंग सेवा :
- पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती देणे .
- टूर प्लॅन करणे .
ई -टुरिझम सेवा /ऑनलाइन बुकिंग पोर्टल :
- स्थानिक पर्यटन अनुभव ( होमस्टे ,ट्रेक ,जेवण ) ऑनलाइन बुकिंग हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा डिजिटल व्यवसाय आहे .
कॅम्पिंग आणि फार्म स्टे अनुभव :
- समुद्र किनाऱ्याजवळ किंवा शेतीत टेंट कॅम्पिंगमध्ये रात्री राहण्याचा अनुभव देणे .
3 ) प्रक्रिया उद्योग व घरगुती उत्पादने
खाद्य प्रक्रिया उद्योग :
- काजू बटर ,मसाला काजू
- नारळ ,तेल ,सुपारी पावडर
- फणसाचे चिप्स ,सुकवलेली फळे
- आंब्याचे आमसूल ,लोणचे ,साखर आंबा ,जॅम
इत्यादी खाद्य प्रक्रिया उद्योग सुरू करता येतात .
हस्तकला आणि कुटीर उद्योग :
- माडाच्या जावळ्यांपासून चटया ,टोपल्या तयार करणे .
- बांबू हस्तकला उत्पादने विक्री करणे .
- कोकणी पारंपरिक लाडू ,चिवडा ,भाजणी पीठ ही उत्पादने स्थानिक हॉटेलांमध्ये किंवा ऑनलाइन विक्री करणे .
4 ) डिजिटल व सेवा आधारित व्यवसाय
ई - कॉमर्स विक्री :
- स्वत:ची वेबसाईट , सोशल मीडिया पेज किंवा इतर प्लॅटफॉर्मचा वापर करून स्थानिक उत्पादने विक्री करणे .
बिलिंग,बँकिंग ,इंटरनेट सेवा केंद्र :
- कोकणात अजूनही ज्या ठिकाणी डिजिटल सेवा पोहोचली नाही त्या ठिकाणी CSC ( Common Service Center ) केंद्रे सुरू करणे .
Youtube / Blogging - कोकण पर्यटन ,पाककृती ,ग्रामीण जीवनशैली :
- कोकण पर्यटन - बोट सफारी /ट्रेकिंग अनुभव साहसी व्हिडिओ बनविणे , निसर्ग व शेती आधारित व्हिडिओ बनविणे ,अप्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती व्हिडिओ बनविणे
- पाककृती - कोकणी पाककृती चॅनल बनवून पारंपरिक रेसिपी शिकविणे .
- ग्रामीण जीवनशैली - गावातील जीवनशैली ,सण -उत्सव दाखविणे .
5 ) मत्स्य व्यवसाय
- कोळंबी /बांगडा /सुरमई मासळीचे साठवण व विक्री
- माशांचे वाळवलेले उत्पादन विक्री
- मत्स्य पालन (fish farming )
- मत्स्य प्रक्रिया यूनिट - फ्रोझन फिश
6 ) घरगुती पद्धतीच्या पदार्थांवर आधारित व्यवसाय
कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती ही देशभर ओळखली जाते . त्यामुळे घरगुती पद्धतीच्या पदार्थांवर आधारित खालीलप्रमाणे व्यवसाय करता येऊ शकतात .
- मालवणी जेवणाचा हॉटेल व्यवसाय
- पोळी भाजी डब्बा सेवा
- सुकी मासळी ,लोणचं,चटणी ,कोकम सरबत
इत्यादी ऑनलाइन ऑर्डर घेणे व डिलिव्हरी सेवा देणे .
- निष्कर्ष :
कोकण ही केवळ निसर्गाची देणगी लाभलेली भूमी नसून उद्योजकतेसाठी अनंत संधी असलेली भूमी आहे. तरुणांना रोजगार निर्माण करण्यासाठी पारंपारिक व्यवसायांना आधुनिकतेची जोड देता येते . या व्यवसायांत जास्त मोठ्या गुंतवणुकी ऐवजी सृजनशीलता, मेहनत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि गुणवत्ता या गोष्टी आवश्यक आहेत.तरुणांनी जर योग्य व्यवसाय निवडला ,तर कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवणे शक्य आहे . हे सर्व व्यवसाय कोकणातील हवामान व संसाधानांशी जुळणारे असल्यामुळे दीर्घकालीन यशाची शक्यता वाढते . आपण जर कोकणात राहात असाल किंवा तेथे काहीतरी व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल ,तर योग्य व्यवसायाची निवड करून ,तसेच स्थानिक संसाधनांचा वापर करून आणि डिजिटल माध्यमाचा वापर करून नक्कीच यशस्वी होऊ शकता .
हे सुद्धा वाचा : खेड्यात राहून पैसे कसे कमवावेत ?
No comments:
Post a Comment
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाइट नाही . तसेच कोणत्याही शासनाशी संबंधित नाही . कृपया ही official वेबसाइट मानू नका आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका . आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारींवर लक्ष्य देऊ शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी ,योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो . धन्यवाद !